गोंदिया (Gondiya) जिल्ह्यामध्ये आजोबा आणि नातीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 40 वर्षीय नराधमाने 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केल्याची घटना घडली आहे. गोंदिया जिल्ह्यातील फुलचुर गावात 5 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. या नराधमाने आपल्या नातीला आणि घराशेजारी राहणाऱ्या मुलीला शेतात नेऊन अत्याचार केला.
यातील एका मुलीचं वय 7 तर दुसऱ्या मुलीचं वय 8 वर्ष आहे. लाजिरवाणा प्रकार म्हणजे या नराधमाने या चिमुरड्यांवर अत्याचार करून त्यांना याविषयी कोठेही वाच्यता न करण्यासाठी 10 रुपयांचे आमिष दिले. (हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन; 11 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)
पीडित मुलींना घरी गेल्यानंतर वेदना होऊ लागल्याने त्यांनी आपल्या आईला घडलेल्या प्रकाराविषयी माहिती दिली. हा सर्व प्रकार ऐकून पीडित मुलींच्या कुटुंबियांना धक्का बसला. त्यानंतर पीडित मुलींच्या नातेवाईकांनी पोलिस स्टेशन गाठून नराधम आजोबा विरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, गोंदिया ग्रामीण पोलिसांनी नराधमावर बाललैंगिक अत्याचार आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच दिल्लीमध्ये प्रसाद देण्याच्या बहाण्याने बोलवून अल्पवयीन मुलीवर महाराजांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या महाराजाला 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपात झूसी भागात प्रयागराज पोलिसांनी अटक केले आहे. राज्यात महिलांवरील बलात्काराचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.