Death | (Photo credit: archived, edited, representative image)

Labourers Suffocate To Death While Cleaning Water Tank: मुंबईतील नागपाडा (Nagpada) येथील एका बांधकामाधीन इमारतीच्या पाण्याच्या टाकीत (Water Tank) गुदमरून चार कामगारांचा मृत्यू झाला. दरम्यान, एका कामगारावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी दुपारी 12:29 वाजता नागपाडा येथील मिंट रोडवरील बिस्मिल्लाह स्पेस इमारतीत घडली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी, मुंबई अग्निशमन दल (एमएफबी), पोलिस, रुग्णवाहिका सेवा आणि बीएमसीचे वॉर्ड कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. जे.जे. रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) यांनी रुग्णालयात पोहोचताच चारही कामगारांचा गुदमरून झाल्याची पुष्टी केली.

प्राप्त माहितीनुसार, बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीची साफसफाई करणारे पाच कंत्राटी कामगार गुदमरल्यामुळे आत बेशुद्ध पडले. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. पोलिस, मुंबई महानगरपालिका आणि अग्निशमन दलाने तातडीने मदत केली आणि सर्व कामगारांना जेजे रुग्णालयात नेण्यात आले. जेजे रुग्णालयाच्या सीएमओने चार कामगारांना मृत घोषित केले. (हेही वाचा -Boy Drowns In Water Tank In Thane: नातेवाईकाच्या घरी गेला आणि जीव गमवून बसला! इमारतीच्या पाण्याच्या टाकीत पडून 3 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू)

मृतांची ओळख पटली आहे असून हसीपाल शेख (19), राजा शेख (20), जिउल्ला शेख (36) आणि इमांडू शेख (38) अशी त्यांची नावे आहेत. पाण्याच्या टाकीवर उपस्थित असलेला पाचवा कामगार पुरहान शेख (31) याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.