Maharashtra Police | (PTI photo)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटात नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज असलेले पोलिसही कोविड-19 (Covid-19) च्या संसर्गाला बळी पडत आहे. मागील 24 तासांत महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) खात्यातील तब्बल 30 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.  तर 4 पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस खात्यातील एकूण 5202 पोलिसांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी 4071 पोलिस कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 1070 पोलिसांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे.

कोविड-19 च्या संकटात पोलिसांनी जीवाची बाजी लावून नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम केले आहे. तसंच नागरिकांना सतर्क करण्याचे काम पोलिस विविध माध्यमातून करत आहेत. लॉकडाऊन काळात पोलिस यंत्रणांवर खूप ताण होता. आता अनलॉक सुरु झाल्यानंतरही पोलिसांवरील जबाबदारी अधिक वाढली आहे.

ANI Tweet:

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 200064 वर पोहचली असून त्यातील 108082 रुग्णांची प्रकृती उपचारानंतर सुधारली आहे. तर 83295 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. राज्यात कोरोना संसर्गामुळे एकूण 8671 रुग्णांचा बळी गेला आहे. दरम्यान राज्यातील कोरोना संसर्ग वाढत असलेली शहरं पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आली आहेत.