High Tide In Mumbai 4th August: मुंबईमध्ये आज दुपारी 12.47 वाजता 4.51 मीटर उंचीच्या लाटा उसळणार- BMC
मुंबईत उच्च भरती | प्रतिनिधित्व प्रतिमा | (Photo Credits: PTI)

Mumbai High Tide 4th August 2020: मुंबई आणि आसपासच्या शहरांना सोमवार रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढलं. आणि आत मंगळवारी दुपार 12:47 वाजता मुंबईत भरती आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने सर्व संबंधित विभागांना सतर्क केले आहे. नागरिकांना कोणत्याही समुद्रकाठ किंवा सखल भागाजवळ जाऊ नये असे महानगरपालिकेकडून सांगण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे सुमारे 4.51 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचं म्हण्टलं जात आहे. त्यामुळे, मुंबईकर नागरिकांना अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये,समुद्रकिनारे तसेच पाणी भरलेल्या ठिकाणापासून लांब राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत आज पहाटे मुसळधार पावसामुळे काही सखोल भागात पाणी साचले आहे. हिंदमाता, दादर टीटी, साकार पंचायत, एसआयईएस कॉलेज, गोयल देउल, भेंडीबाजार जंक्शन, जेजे जंक्शन, ठाकुरद्वार नाका, शानमुखानंद हॉल, शेख मिस्त्री दर्गा रोड आणि पोस्टल कॉलनी येथेही पाणी साचल्याची नोंद झाली आहे. (Mumbai Rain Update: मुंबई मध्ये जोरदार पाऊस; परेल, हिंदमाता भागात साचले पाणी, समता नगर येथे भुस्सखलन)

BMC ट्विट

भारत हवामान खात्याने (आयएमडी) सोमवारी 4 ऑगस्ट आणि 5 ऑगस्टला मुसळधार पावसासाठी रेड अ‍ॅलर्ट जारी केल्याने महापालिकेने खबरदारीची पावले उचलली आहेत.  काल रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि आयएमडीतर्फे अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.