
मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये एका 37 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल करत मुंबई पोलिसांनी दीपक अन्नाप्पा कुंचीकुर्वे (31) या आरोपीला अटक केली आहे.
एनडीटीव्ही ने दिलेल्या वृत्तानुसार, हा धक्कादायक प्रसंग शुक्रवारी सायन हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावर पडला. पीडित महिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असलेल्या आपल्या बहिणीच्या देखभालीसाठी हॉस्पिटलमध्ये येत असे. त्या दिवशीही ती काही कामानिमित्त हॉस्पिटलमध्ये आली होती. तेव्हा आरोपी महिलेजवळ आला आणि त्याने तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. मेडिकल बिल्स संबंधित फॉर्म भरण्याबद्दल तो बोलू लागला. मात्र याबद्दल मला काही ठाऊक नसल्याचे महिलेने सांगितल्यावर त्याने पाचव्या मजल्यावर काऊंटर असल्याचे सांगत महिलेले तेथे नेले. त्यानंतर संधी साधत त्याने महिलेवर बलात्कार केला. (औरंगाबाद येथील महिला नगरसेविकेवर पुणे येथे बलात्कार, चार जणांवर गुन्हा दाखल)
महिलेने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासून या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.