पुण्यात आज (17 ऑगस्ट) पोलिस कमिशनर ऑफिस (Pune Police Commissioner’s Office) मध्ये एक थरारक प्रकार घडला आहे. 34 वर्षीय व्यक्तीने कार्यालय परिसरात स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पेटलेल्या अवस्थेतच त्याने कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी गेटवर असणार्या व्यक्तींनी प्रसंगावधान राखत त्याला रोखून आग विझवली. या प्रकारामध्ये संबंधित व्यक्ती गंभीर दुखापतीने ग्रस्त झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीला पुण्यात ससून रूग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे.
पुण्यात साधू वासवासी चौक परिसरामध्ये असलेल्या पुणे पोलिस कमिशनर कार्यालयात हा प्रकार घडला. आज सकाळी 11.30 च्या सुमाराची ही घटना असून या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, हा 34 वर्षीय तरूण खडकीचा रहिवासी होता. त्याच्या काही कामासाठी तो फॉलोअप साठी आला होता. अन्य मीडीयारिपोर्ट्स नुसार या व्यक्तीला चारित्र पडताळणी प्रमाणपत्र हवे आहे मात्र त्याच्यावर काही गुन्हे असल्याने तो त्याला मिळू शकत नाही. यावरूनच त्याने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं सांगितलं जात आहे.
Pune | A 34-year-old man attempted self-immolation at the entrance of the Pune City Police Commissioner's office. He has been admitted to Sassoon General Hospital. Details awaited#Maharashtra
— ANI (@ANI) August 18, 2021
असिस्टंट कमिशनर ऑफ पोलिस (लष्कर विभाग) चंद्रकांत सांगळे यांनी इंडियन एक्सप्रेस सोबत बोलताना,'संबंधित व्यक्ती गंभिररित्या भाजली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. आता नक्की काय घडलं याचा पाठपुरावा सुरू झाला आहे.'