COVID 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने आता भारतातही घुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून योग्य ते निर्णय घेतले जात आहेत. यामुळे मुंबई (Mumbai) शहरातील कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसत आहे. मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत 204 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आज 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एकूण 324 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे कोरोना बाधीतांची संख्या 5 हजार 194 वर पोहचली आहे. यापैंकी 551 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरुवातीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात जमावबंदी कायदा लागू केला होता. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसांकरिता संचारबंदी घोषीत केली होती. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन 3 मेपर्यंत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.कोरोना विषाणूने संपूर्ण देशात थैमान घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या संख्येत वाढ झाली आहे. भारतात आतापर्यंत 26 हजार 919 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनामुळे 826 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 5 हजार 910 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधीतांची संख्या 8 हजार 068 वर पोहचली आहे. त्यांपैकी 342 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 हजार 076 जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे देखील वाचा- Coronavirus: कोरोनामुळे निधन झालेल्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या परिवाराला सरकारकडून प्रत्येकी 50 लाखांची मदत- अनिल देशमुख

एएनआयचे ट्वीट-

देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजण्यात येत आहेत. एवढेच नव्हेतर WHO सोबतही चर्चा झाल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. देशात लॉकडाउनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या कालावधीत आम्हाला उपाय योजना करण्यासाठी अवधी मिळेल असेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.