नवी मुंबई येथील तुर्भे परिसरातील एमआयडीसी भागात सापडला 30 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

नवी मुंबई (Navi Mumbai) येथील तुर्भे (Turbhe) परिसरातील एमआयडीसी भागात एका पोत्यात 30 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. संबिधित व्यक्तीचा मृतदेह त्याच्या घरापासून 25 मीटरच्या अंतरावर आढळला आहे. स्थानिक पोलिस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहे. तसेच हत्या करण्यामागे नेमका काय हेतू होता? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेमुळे आजुबाजुच्या परिसरात धक्कादायक वातावरण निर्माण झाले आहे.

संतोष कसबे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून नवी मुंबई येथील इंदिरा नगर परिसरात तो राहत होता. संतोष हा सोमवारी संध्याकाळी गुजरातला जाण्याच्या हेतूने घराबाहेर पडला होता, अशी माहिती त्याचे काका भूपेंद्र कसबे यांनी दिली आहे. मात्र, दुसऱ्या दिवशी घरापासून 25 मीटर अंतरावर मृतदेह सापडल्याने सर्वांना धक्का लागला आहे. ज्यावेळी संतोषचा मृतदेह सापडला, तेव्हा त्याचे हातपाय दोरीने बांधलेले होते. यावरुन संतोष याची हत्या झाल्याचे पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे. हे देखील वाचा- धक्कादायक! मोबाईल गेमचे आमिष दाखवत एका तरूणाकडून 6 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष हा दक्षिण मुंबई येथे भाऊचा धक्का येथे काम करत होता. त्याचा परिवारातील सदस्यांना मृतदेहाची ओळख पटली आहे. तसेच मृतांचे शरीर शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.