Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी पहा एका क्लिक वर
Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus In Maharshtra: महाराष्ट्रात काल, 29 जून च्या दिवसभरात पुन्हा एकदा 5257 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून 181 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. यानुसार, राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 169883 वर पोहोचला आहे. सध्या राज्यात 73298 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासोबतच काल 2385 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आजवरची डिस्चार्ज मिळवलेल्या रुग्णांची संख्या 88 हजार 960 झाली आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचे आकडे मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण- डोंबिवली, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या भागातून अधिक प्रमाणात समोर येत आहेत. तर कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांमध्ये सुद्धा कमी संख्येत मात्र सतत कोरोना रुग्णांची वाढ होतेय. महाराष्ट्रातील  सर्व जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

(हे ही वाचा- Mission Begin Again 2: महाराष्ट्रात 1 जुलैपासून 'मिशन बिगीन अगेन'च्या दुसऱ्या टप्प्याला होणार सुरुवात; राज्यात नेमके काय राहणार सुरु आणि काय बंद? घ्या जाणून)

 महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे कोरोना वाढण्याच्या प्रमाणापेक्षा अधिक आहे, त्यामुळे परिस्थिती अजूनही नियंत्रणात आहे असेच म्हणता येईल. राज्यात सध्या कोरोनाचा रिकव्हरी रेट 52.37% आहे तर मृत्युदर हा अवघा 4. 48 टक्के आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
मुंबई 76,665 4463 43,545
ठाणे 36,002 871 14,656
पुणे 21,303 740 10,943
पालघर 5578 101 2621
औरंगाबाद 5107 239 2296
नाशिक 4111 218 2166
रायगड 3980 95 2003
जळगाव 3301 228 1845
नागपुर 1448 15 1101
अकोला 1509 73 925
सातारा 1043 43 706
सोलापुर 2634 257 1444
कोल्हापुर 841 10 711
रत्नागिरी 570 26 424
धुळे 1032 54 496
अमरावती 532 28 382
जालना 535 14 333
सांगली 368 11 207
नांदेड 342 13 231
अहमदनगर 423 14 258
हिंगोली 266 1 238
यवतमाळ 283 10 203
लातुर 320 17 191
उस्मानाबाद 207 10 164
सिंधुदुर्ग 218 4 152
बुलडाणा 228 12 145
गोंदिया 123 1 102
बीड 112 3 86
परभणी 96 4 76
नंदुरबार 173 7 70
भंडारा 79 0 58
वाशिम 102 3 64
गडचिरोली 64 1 53
चंद्रपुर 86 0 54
वर्धा 17 1 11
अन्य जिल्हे 85 23 0
एकुण 1,69, 883  7,610 88, 960 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोना व्हायरस वरील रुग्णाच्या थेरपी साठी प्रोजेक्ट प्लॅटिना ची सुरुवात केली आहे. प्लाझ्मा थेरपीचे हे जगातील सर्वात मोठे केंद्र असून यामार्फत कोरोना रुग्णांवर उपचार सुरु केले जाणार आहेत.

दुसरीकडे राज्यातील लॉक डाऊन हा आता पुढील संपूर्ण महिना म्हणजेच 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आला आहे. यावेळी अनेक नियमांना शिथिलता देनाय्त आली आली तरी विशेषतः कंटेनमेंट झोन मध्ये कडक बंद पळाला जाईल यावर भर देण्यात आला आहे.