Nagpur Stray Dog Attack on Child: राज्यभरात कुत्र्यांच्या हल्ल्यात(Stray Dog Attack) बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. नागपूरातून अशीच घटना समोर आली आहे. ३ वर्षाचा चिमुकला खेळण्यासाठी घराबाहेर पडला आणि भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू (Child Died in Stray Dog Attack)झाला. वंश अंकुश शहाणे (वय ३) असं मृत चिमुकल्याचं नाव आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मागील काही दिवसांपासून मौदा परिसरात भटक्या कुत्र्यांनी चांगलाच हैदोस घातला आहे. लहानगयांसह मोठ्यांचा चावा घेऊन कुत्र्यांनी अनेकांना जखमी केले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून स्थानिकांकडून भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी होत आहे.(हेही वाचा:Dog Attack in Karnataka: कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षांची मुलगी गंभीर, पंधरा दिवसांनंतर रुग्णालयात अखेर मृत्यू )
काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना नागपूर जिल्ह्यातील मौदा गावात मंगळवारी (ता. २१) घडली. गणेश नगर परिसरात अंकुश शहाणे आपल्या कुटुंबियासोबत राहतात. त्यांना वंश हा ३ वर्षाचा मुलगा होता. मंगळवारी आई घरकामात व्यस्त असताना वंश खेळण्यासाठी घराबाहेर पडला. मात्र, त्याचवेळी भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात वंश गंभीर जखमी झाला. त्याला जखमी पाहून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.(हेही वाचा:Delhi Dog Attack Video: दिल्लीत विश्वास नगरमध्ये पाळीव कुत्र्याचा चिमुकल्यावर हल्ला, भयावह व्हिडिओ समोर )
परिसरातील विविध वस्त्यांमध्ये मोकाट कुत्री फिरत असतात. अशी तक्री गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांकडून होत आहे. दोन भटकी रस्त्यावर बसली होती. वंशला पाहताच या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. एका कुत्र्याने वंशची मान तोंडात घट्ट पकडली होती. तर दुसऱ्या कुत्र्याने त्याच्या खांद्याला पकडले होते. दरम्यान, वंशचा रडण्याचा आवाज आल्याने शेजारी राहणारे बाहेर आले. त्यांनी कुत्र्यांना हुसकावून लावले. गंभीर अवस्थेत असलेल्या वंशला उपचारासाठी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला.