Maharashtra: महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील पॉवरलूम फॅक्टरीची भिंत कोसळून 3 कामगारांचा मृत्यू
मृत्यू/प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: ANI)

Maharashtra: महाराष्ट्रातील (Maharashtra) ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील पॉवरलूम फॅक्टरीची (Powerloom Factory) भिंत कोसळून 3 कामगारांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास तुकाराम कॅम्पस परिसरात झाला.

ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख संतोष कदम यांनी शुक्रवारी रात्री उशिरा एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “पॉवरलूम फॅक्टरीच्या भिंतीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. मात्र, ही भिंत कोसळली. या भिंतीखाली तीन कामगार दबले गेले आणि चार जण जखमी झाले." (वाचा - Jalgoan: धक्कादायक! जळगाव येथील 5 दिवसांच्या कोरोनाबाधित चिमुकल्याचा मृत्यू)

जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे मनसुख भाई (वय, 45), रणछोड प्रजापती (वय,50) आणि भगवान जाधव (वय, 55) अशी आहेत. या सर्वांचे मृतदेह सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.