महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या चिंताजनक आहे. कोरोनावर मात करण्यासाठी राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यातच जळगाव (Jalgaon) येथून मनाला चटका लावणारी माहिती समोर आली आहे. कोरोना संक्रमित महिलेच्या प्रसुतीनतंर तिच्या बाळालाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. ज्यामुळे अवघ्या पाच दिवसात या बाळाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय न रुग्णालयात आज (16 एप्रिल) घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील एका गर्भवती महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला होता. या महिलेने गेल्या शनिवारी एका मुलाला जन्म दिला आहे. मातेच्या पोटात पाणी झाल्यामुळे साडे सात महिन्यातच सिझर करावे लागले. कमी दिवसांत जन्मलेल्या बाळाची प्रकृती पहिला दिवसापासूंनच गंभीर होती. या बाळाला वजन कमी असून त्याला श्वास घेण्यातही त्रास होत होता. मात्र, आज अखेर पाचव्या दिवशी बाळाचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 63,729 रुग्णांची व 398 मृत्यूची नोंद
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बालकांचे गंभी होण्याच्या प्रमाणात अधिक वाढ झाली आहे. यामुले पालकांनी आपल्या मुलांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे, जळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे एवढ्या लहान बालकाचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. या बाळाची माता ही बाधित असून रुग्णालयात दाखल आहेत. बाळाच्या करोना बाधित आईची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.