Bank Holidays In Maharashtra: बॅंकेची कामं उरका लवकर, या आठवड्यात 3 दिवस बॅंका राहणार बंद
Image used for representational purpose (Photo Credit: PTI)

Bank Holidays In Maharashtra: तुमचं बॅंकेमध्ये काही महत्त्वाचं काम असेल तर आज, उद्या मध्ये उरका नाहीतर तुम्हांला थेट पुढच्या सोमवार (18 एप्रिल) पर्यंत वाट पहावी लागू शकते. या आठवड्यामध्ये 14 ते 17 एप्रिल दरम्यान सलग सुट्ट्या आल्याने महाराष्ट्रात 3 दिवस बॅंक बंद राहणार आहे. त्यामुळे तुमचं फारच महत्त्वाचं काम असेल तर आजच बॅंकेमध्ये जाऊन ते आटपायला विसरू नका.

महाराष्ट्रात 14 ते 17 एप्रिलच्या विकेंड मध्ये 14 एप्रिल हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस अर्थात भीम जयंती निमित्त सुट्टी आहे. त्यानंतर 15 एप्रिल हा गुड फ्रायडे आणि 17 एप्रिल हा रविवार असल्याने बॅंका बंद असणार आहेत. 16 एप्रिल शनिवार दिवशी महाराष्ट्रात बॅंका सुरू असणार आहेत. पण देशात काही ठिकाणी या दिवशीही काही स्थानिक सणांमुळे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

यंदा एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला देखील अशाच प्रकारे सलग सुट्ट्यांमुळे महत्त्वाचे आर्थिक व्यवहार लांबणीवर पडलेले होते. आरबीआय कडून प्रदेशानुसार स्थानिक सण आणि महत्त्वाचे दिवस पाहून सुट्टी जाहीर केली जाते. हे देखील नक्की वाचा: April 2022 Bank Holiday List: एप्रिल महिन्यात गुढीपाडवा ते गुड फ्रायडे चा सण पहा किती दिवस बंद आहेत बॅंका .

दरम्यान आता बॅंकेच्या व्यवहार हे डिजिटल माध्यमातून करणं सुकर झाले आहे त्यामुळे अनेकांसाठी सलग बॅंक बंद असली तरीही फार मोठा फटका बसत नाही.  सध्या ऑनलाईन बॅंकिंग आणि युपीआय मुळे कुठूनही कुठेही पैसे ट्रान्सफर करता येऊ शकतात.