पुणे: अमली पदार्थांची तस्करी करणा-या तिघांना हडपसर येथून पोलिसांनी केली अटक, 120 किलो गांजा जप्त
Ganja Seized (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) लॉकडाऊन सुरु असताना देखील अमली पदार्थांची तस्करी करणा-या तिघांना पुणे पोलिसांनी (Pune Police) सापळा रचून गजाआड केले आहे. हे तिघे टेम्पोमधून 120 किलो गांजाची तस्करी करत होते. विशाखापट्टणमहून मुंबईत गांजाची वाहतूक करणाऱ्या टोळीवर पुण्यात पोलिसांनी धडक कारवाई केली. ही टोळी कारमधून आणि टेम्पोतून गांजाच्या तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हे तिघे परप्रांतीय असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, हे टोळी विशाखापट्टणम हून मुबईत गांजाची तस्कीर करण्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून त्यांच्या कारमधून 48 किलो गांजा आढळला तर छोट्या टेम्पोमध्ये शहाळ्याच्या खाली लपवलेला 72 किलोचा गांजा पोलिसांनी जप्त केला. ‘या’ देशाच्या अध्यक्षांवर अमेरिकेत 20 वर्षे अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा आरोप; अटक करणाऱ्याला 112 कोटींचे बक्षीस जाहीर

मुंबईत राहणाऱ्या समीर शेख, हिमायतउल्ला शेख आणि अश्विन दानवे अशी या तिघांची नावे असून यांच्यावर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे लॉकडाऊन मुळे गुन्हेगारीचे प्रमाण घटले आहे. यात गोव्यात गुन्हेगारीचे प्रमाण जवळजवळ 67 टक्क्यांनी कमी झाले आहे. तसेच ड्रग्ज जप्तीच्या कारावाया सुद्धा सध्या करण्यात आल्या नाही आहे. कारण सध्या राज्याची सीमा बंद असल्याने कोणत्याही पर्यटकास किंवा नागरिकास येण्यास परवानगी नाही आहे. त्यामुळे गोव्यात पर्यटकच नसून ड्रग्सची मागणी सुद्धा कमी झाली असल्याची माहिती एसीपी स्पेशल ब्रांच शोबीत सक्सेना यांनी दिली आहे