Arrest. Representational Image. (Photo Credit: ANI)

पुण्यातील (Pune) एका वकिलाचे अपहरण (Kidnapping Of a Lawyer) करून त्यांची हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. उमेश मोरे, (Umesh More) असं या मृत वकिलाचं नाव आहे. मोरे यांचा खून करून त्यांचा मृतदेह ताम्हिणी घाटात फेकण्यात आला होता. उमेश मोरे हे शहरातील शिवाजीनगर न्यायालयात प्रॅक्टिस करत होते. या प्रकरणी पोलिसांनी आज 3 जणांना अटक केली आहे.

दरम्यान, हरवलेल्या व्यक्तीची तक्रार नोंदवून एफआयआर दाखल करण्यात आला होता. प्राथमिक चौकशीत आरोपींनी वकिलाचा खून करून त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट केले आहे. आम्ही या प्रकरणी 3 जणांना अटक केली आहे. आरोपींना 4 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे, असं पुणे शहर पोलिस आयुक्तांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - मुंबई: BMC च्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू असताना विजेचा शॉक लागून 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू; 5 जण जखमी)

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे कपिल विलास फलके, दीपक शिवाजी वांडेकर, रोहित दत्तात्रय शेंडे, असे आहेत. आरोपींनी जमिन वादातून उमेश मोरे यांची हत्या केली असल्याचे समोर आले आहे. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक गुन्हेगारीच्या घटना घडत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढत आहे.