Coronavirus Outbreak | Representational Image | (Photo Credits: IANS)

Coronavirus: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात आज 28 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 349 वर पोहोचली आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, नांदेड, अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

राज्यात मंगळवारी 841 नवे रुग्ण सापडल्याने एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 15 हजार 525 झाली आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांत 700 कोरोना रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सोमवारी 350 तर मंगळवारी 354 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सलग दोन दिवस एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सुमारे सव्वा महिन्यात 2819 कोरोना रुग्णांना घरी सोडण्यात आले असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. (हेही वाचा - Shramik Special Trains: लॉकडाऊनमुळे वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात अडकून पडलेले बिहारमधील 1 हजार 019 मजूर पटनाकडे रवाना)

राज्यात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ आहे. साधारणत: मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडणे सुरू आहे. मार्चमध्ये दोन अंकी असलेली ही संख्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तीन अंकी झाली असल्याचही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. गेल्या दोन दिवसात राज्यात सर्वाधिक मुंबई मंडळात 460 रुग्ण घरी गेले आहेत. त्यापाठोपाठ पुणे मंडळात 213 रुग्णांना बरे करून घरी पाठविण्यात आले असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले आहे.