Coronavrius Cases In Dharavi: धारावीत (Dharavi) आज 28 जणांना कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाली आहे. त्यामुळे धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 2134 वर पोहोचली आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे. आतापर्यंत धारावीत 78 जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.
धारावीत बुधवारी एका कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अर्ध्यावर आली आहे. धारावीत आतापर्यंत 1,053 कोरोनामुक्त झाले आहेत. मागील महिन्यात धारावीत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. परंतु, सध्या धारावीत कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होताना दिसत आहे. (हेही वाचा - Palghar: कोरोना व्हायरस चाचणीचा निकाल येण्याआधीच उरकले लग्न; तीन दिवसांनंतर नवरा मुलगा आढळला कोरोना संक्रमित, गुन्हा दाखल)
28 new #COVID19 cases have been reported in Dharavi area of Mumbai today, taking the total number of cases to 2134. A total of 78 people have succumbed to the disease in the area so far: Brihanmumbai Municipal Corporation, Maharashtra
— ANI (@ANI) June 18, 2020
राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या मुंबई शहरात आढळून येत आहे. मुंबईतील अनेक ठिकाणं कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. त्यामुळे या ठिकाणांहून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान, बुधवारी मुंबईत 1 हजार 359 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, 77 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या 61 हजार 501 वर पोहोचली आहे. यातील 3 हजार 242 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत 31 हजार 338 जणांना कोरोनावर मात केली आहे.