कोरोना व्हायरस (Coronavirus) उद्रेकाबाबत आज महाराष्ट्राने (Maharashtra) एक महत्वाचा टप्पा गाठला. आज महाराष्ट्रामध्ये 583 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे व अशा प्रकारे राज्यात एकूण रुग्ण संख्या 10,498 झाली आहे. आज राज्यात एकूण 27 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण 1773 लोकांना बरे झाल्यानंतर सोडण्यात आले आहे, त्या पैकी आज 180 जणांना सोडण्यात आले. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉक डाऊनचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी प्रशासन झटत आहे. सध्या राज्यामध्ये मुंबई आणि पुणे या ठिकाणी कोरोना बाधितांची सर्वाधित प्रकरणे आहेत त्यामुळे या ठिकाणी विशेष काळजी घेतली जात आहे.
एएनआय ट्विट -
27 deaths and 583 new #COVID19 positive cases reported in Maharashtra today; the total number of cases stands at 10498: State Health Department
— ANI (@ANI) April 30, 2020
आज बीएमसीने (BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरातील धारावी (Dharavi) परिसरात आणखी नवे 25 जण कोवीड 19 संक्रमित सापडले आहेत. त्यामुळे धारावी परिसरातील कोरोना विषाणू संक्रमित रुग्णांची संख्या तब्बल 369 इतकी झाली आहे. यासह आज मुंबईमध्ये एकूण 417 नवे रुग्ण आढळले आहेत व शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6,874 इतकी झाली आहे.
पुण्यातील वाढती रुग्ण संख्या पाहता पुणे सह पोलिस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात 1 मे ते 3 मे या दरम्यान हॉटस्पॉट्समधील सर्व दुकाने बंद ठेवण्यचा आदेश दिला गेला आहे. यामध्ये रुग्णालये आणि मेडिकल स्टोअर्सना सूट देण्यात आली आहे. शहरातील हॉटस्पॉट्समधील दुधाची दुकाने सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेतच सुरु राहणार आहेत. तसेच दुधाचे घरपोच वितरण हे सकाळी 6 ते 10 या दरम्यानच होणार आहे. (हेही वाचा: Coronavirus: गेल्या 24 तासात देशात कोरोना व्हायरस संक्रमित 630 जण बरे, COVID 19 रुग्णांचा प्रकृती सुधारणा दर 25.19%)
भारताबद्दल बोलायचे झाले तर, देशात गेल्या 24 तासांत 1718 नवीन कोरोना बाधित प्रकरणे नोंदवली गेली असून, एकूण रुग्णांची संख्या 33,050 झाली आहे. देशात गेल्या 24 तासात कोरोना व्हायरस संक्रमित 630 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोना संक्रमित रुग्णांच्या बरे होण्याचा सरासरी दर हा 25.18% इतका राहिला आहे. 14 दिवसांपूर्वी हाच दर 13.6% इतका होता.