Suicide Representational Image (Photo Credits: ANI)

UPSC Aspirants Suicide In Delhi: दिल्लीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार नागरी सेवा उमेदवारांच्या मृत्यूमुळे (UPSC Aspirants Deaths) सर्वत्र तणाव कायम असतानाच आता UPSC ची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणीने दिल्लीत आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी एक भावूक संदेश देत सरकारला आवाहन केलं आहे. महाराष्ट्रातील नागरी सेवेसाठी इच्छुक असलेली अंजली दिल्लीतील जुन्या राजिंदर नगरमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होती. मात्र, 21 जुलै रोजी तिने आत्महत्या केली. तिने तिच्या सुसाईड नोटमध्ये (Suicide Note) नैराश्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. पहिल्याचं प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण व्हावी, असं अंजलीचं स्वप्न होतं. मात्र, आता तिच्या आत्महत्येमुळे तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अंजलीने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे की, 'मला माफ करा, मम्मी आणि पप्पा. मी सध्या जीवनाला कंटाळले आहे. माझ्या आयुष्यात फक्त समस्या आणि समस्या आहेत. कुठेही शांतता नाही. मला शांततेची गरज आहे. मी या तथाकथित नैराश्यापासून मुक्त होण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले, पण मी यावर मात करू शकत नाही. माझे मानसिक आरोग्य सुधारत नाही... तुम्ही मला साथ दिलीस, पण जोपर्यंत मी स्वतःला मदत करत नाही तोपर्यंत मी बरे होऊ शकत नाही... त्यामुळे मला आता आनंदाने जायचे आहे आणि शांततेत राहायचे आहे.' (हेही वाचा -Delhi IAS Coaching Centre Deaths: आता CBI करणार राजेंद्र नगर कोचिंग सेंटरमधील यूपीएससी उमेदवारांच्या मृत्यूंची चौकशी)

अंजलीने पुढे सुसाईड नोटमध्ये तिच्या कुटुंबाला तिचे अवयव गरजूंना दान करण्याची विनंती केली आहे. याशिवाय, तिने सरकारला देशात इच्छामरणाला मान्यता देण्याचे आवाहन केले आहे. तसेच तिने सरकारी परीक्षांमधील घोटाळे कमी करण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी सुधारणा करण्याची मागणी केली. कारण अनेक तरुण नोकऱ्यांसाठी संघर्ष करत आहेत. (हेही वाचा - Delhi IAS Coaching Centre Tragedy: Vikas Divyakirti यांच्याकडून दिल्ली कोचिंग सेंटर दुर्घटनेतील मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर)

याव्यतिरिक्त, अंजलीने तिच्या सुसाईड नोटमध्ये पीजीच्या वाढत्या भाड्यावरही प्रकाश टाकला आहे. तिने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे की, पीजी मालक विद्यार्थ्यांचे शोषण करत आहेत. प्रत्येकाला ते परवडत नाही. दिल्ली पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.