Maharashtra Monsoon Update: मुंबई, पुणे, नाशिक व कोकणात आज संध्याकाळी पावसाचे अंदाज- IMD
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit- Flickr)

आज, 26 जुलै रोजी संध्याकाळी राज्यात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. आयएमडीचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर (K.S. Hosalikar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी पुणे (Pune), नाशिक (Nashik) आणि दक्षिण कोकणात (South Konkan) पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय मुंबईत (Mumbai Rains)  सुद्धा 1 ते 2 वेळा पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज आहे. कालपासून मुंबईत अगदी तुरळक पाऊस झाला आहे. आज सकाळपासून सुद्धा पावसाने दडीच मारली होती. उपनगरात अनेक ठिकाणी कडकडीत ऊन सुद्धा पडलं आहे, मात्र आता संध्याकाळच्या वेळेत पाऊस येईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसात फार जोरदार पावसाची शक्यता अगदी धुसर आहे. मुंबई सह महाराष्ट्राच्या इतर भागात मागील काही दिवसांत अधून मधून जोरदार सरी बरसत आहेत. परंतू धरणक्षेत्र आणि तलावांमध्ये अद्याप पुरेसा पाऊस नसल्याने थोडी चिंता वर्तवण्यात येत आहे. TOI च्या रिपोर्ट्सनुसार, यंदा मुंबईच्या तलावांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 50% पेक्षा कमी पाणीसाठा आहे. परंतू अद्याप मुंबई महानगरपालिकेने शहरात पाणीकपात जाहीर केलेली नाही.

के. एस. होसाळीकर ट्विट

दरम्यान, जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यातच महिन्याभरासाठी अपेक्षित 50 टक्के पाऊस झाल्याचे समजत होते. एकीकडे पाऊस होत असूनही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत नसल्याने चिंता आहे.