मुंबईच्या (Mumbai) डब्बेवाला संघटनेत (Dabbewala Association) कोरोनामुळे (Coronavirus) मृत्यूचे पहिले प्रकरण नोंदवले गेले आहे. बुधवार, 24 जून रोजी मुंबईच्या नायर रुग्णालयात डब्बेवाले संघटनेच्या 39 वर्षीय डब्बेवाला रुग्णाचे निधन झाले आहे. सदर रुग्ण हे मालाड (Malad) येथील रहिवाशी होते, परिवाराच्या विनंतीवरून त्यांचे नाव उघड करण्यात आलेले नाही. पीटीआयच्या माहितीनुसार, रुग्णाला कोरोना झाल्याचे समजताच त्यांना तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी उपचार सुरु असताना बुधवारी संध्याकाळी त्यांनी जीव सोडला आता त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि एक 5 वर्षीय मुलगा सुद्धा आहे. या दोघांनाही आता विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. याबाबत डब्बेवाले संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर (Subhash Talekar) यांनी पीटीआयला माहिती दिली आहे. महाराष्ट्र: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
प्राप्त माहितीनुसार, जोरून व्हायरसचा प्रभाव वाढू लागल्यावर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये डब्बेवाला संघटनांचे काम सुद्धा बंद झाले होते. गेल्या तीन महिन्यांपासून काहीच काम नसल्याने या डब्बेवाला वर्गातील कर्मचाऱ्यांना सुद्धा आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यांच्यासाठी राज्य सरकारने काहीतरी करावे अन्यथा काम उपब्ध करून द्यावे अशी विनंती सुद्धा डब्बेवाला संघटना अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी म्हंटले आहे.
PTI ट्विट
#COVID19 claims life of 39-year-old 'dabbawala' (lunch box carrier) in Mumbai, first from the fraternity to succumb to coronavirus: Official
— Press Trust of India (@PTI_News) June 25, 2020
दरम्यान, मुंबईत कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र अजूनही कोरोना रुग्णानाचे आकडे काही कमी होताना दिसत नाहीत. सद्य घडीला मुंबईत कोरोनाचे तब्बल 69528 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. तर या व्यक्तीच्या निवासस्थानाच्या भागात म्हणेजच मालाड मध्ये सुद्धा कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत.