Coronavirus Outbreak (Photo Credits: PTI)

गेले काही दिवस मुंबईमध्ये (Mumbai) रोज हजाराच्या वर कोरोना विषाणूचे (Coronavirus) रुग्ण आढळून येत आहेत. आज शहरामध्ये 2,227 रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये रुग्णांथी दुहेरी नोंद व मुंबई बाहेरील रूग्णांच्या रिकंसीलेशन नंतर आजची बाधित रुग्णांची संख्या कमी होऊ शकते. यासह एकूण संक्रमितांची संख्या 1,60,774 वर पोहोचली आहे. रिकंसीलेशन नुसार 239 बाधित रुग्ण दुहेरी नोंद असल्यामुळे प्रगतीपर अहवालातून कमी करण्यात आले आहेत. आज शहरामध्ये 839 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 1,26,745 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या 25,659 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज शहरामध्ये 43 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 7,982 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 37 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 28 रुग्ण पुरुष व 15 रुग्ण महिला होत्या. यातील एकाचे वय 40 वर्षा खाली होते, 30 जणांचे वय 60 वर्षा वर होते. तर उर्वरित 12 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. सध्या मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 79 टक्के इतका आहे. 2 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.10 टक्के झाला आहे. 8 सप्टेंबर 2020 पर्यंत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 8,56,454 इतक्या आहेत. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 63 दिवसांवर आला आहे. (हेही वाचा: कोरोना व्हायरस Sputnik V Vaccine परीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी रशियाने मागितली भारताकडे मदत)

एएनआय ट्वीट -

दरम्यान, आज महाराष्ट्रामध्ये 23,816 कोरोनाव्हायरस संक्रमित आढळले आहेत. आज 13,906 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे, तर 325 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या आता 9,67,349 इतकी झाली आहे. आजपर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 6,86,462 इतकी असून, रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 2,52,734 इतकी आहे.