अक्षय्य तृतीया एक शुभ मुहूर्त! साडेतीन मुहर्तांपैकी एक. या दिवशी सोने खरेदी, मौल्यवान वस्तू खरेदी, घर खरेदी केली जाते. विशेष म्हणजे सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. या दिवशी सोन्याच्या दुकानांमध्ये एकच झुंबड उडालेली दिसते. तुम्ही देखील अक्षय्य तृतीये निमित्त सोनं खरेदी करताय? मग जाणून घ्या काय आहेत आजचे सोन्याचे दर.... (पहा काय होता कालचा दर)
गुड ₹ रिटर्न्स (Good₹Returns) वेबसाईटनुसार सोन्याचे दर:
हा दर 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम सोन्यामागील आहे...
शहरं | 22 कॅरेट सोनं | 24 कॅरेट सोनं |
मुंबई | 30,750 | 31,900 |
पुणे | 30,750 | 31,900 |
नाशिक | 30,750 | 31,900 |
नागपूर | 30,750 | 31,900 |
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या महत्त्वाच्या शहरांमध्ये सोन्याचे दर सारखेच आहेत. 3 मे च्या तुलनेत आज सोन्याचा दर 150 रुपयांनी वाढला आहे. त्याचबरोबर टॅक्स आणि दागिन्यांवरील घडणावळ यामुळे दर वर-खाली होऊ शकतात.