Mumbai Police Commissioner | (Photo credit: archived, edited, representative image)

IPS Officers Transfer: राज्यातील पोलीस दलात बदल्यांची मोहीम जोरात सुरू आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी बदलण्याची सपाटा लावला आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याकरून राज्यात पोलीस दलात नवी व्यवस्था उभी करण्याचा भाग म्हणून या बदल्या होत आहेत. राज्याच्या गृहखात्याने गुरुवारी पुन्हा बदल्यांचा आदेश काढला. त्यात 21 अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.बदल्यांचा हा आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

 

विशेष म्हणजे, मराठा आंदोलनात आंदोलकांवर लाठीमार प्रकरणात तेव्हाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साइडलाईन केलेले आयपीएस तुषार दोशी आता साताऱ्यात आले आहेत. त्यांच्याकडे सातार पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहेत.