Coronavirus | (Photo Credits: Pixabay.com)

महाराष्ट्रासह  (Maharashtra) संपूर्ण देशात कोरोना विषाणूने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून योग्य ते निर्णय घेतले जात आहेत. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यात आज 2 हजार 33 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 35 हजार 58 वर पोहचली आहे. यापैकी 1 हजार 249 अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 8 हजार 437 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात चौथ्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. तसेच लॉकडाउनचा चौथा टप्पा 31 मेपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. सध्या भारतात एकूण 96 हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 3 हजार 29 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 36 हजार 824 जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे देखील वाचा- Coronavirus: मुंबई-पुण्याहून आलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील 3 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

एएनआयचे ट्वीट-

देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाय योजना राबवल्या जात आहेत. एवढेच नव्हेतर WHO सोबतही चर्चा झाल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. देशात लॉकडाउनचा कालावधी 31 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या कालावधीत आम्हाला उपाय योजना करण्यासाठी अवधी मिळेल, असेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.