Home Minister Anil Deshmukh | (Photo Credits: Twitter)

पंजाब (Punjab) मधील लवली प्रोपेशनल युनिव्हर्सिटीत (Lovely Professional University) लॉकडाऊनमुळे (Lockdown) महाराष्ट्रातील 200 विद्यार्थी अडकले होते. त्यात 25 मुलींचा समावेश असून एका नेत्रहीनाचा समावेश आहे. शनिवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी नाशिकला बसमधून त्यांचा प्रवास सुरू होताना त्यांच्याशी व्हिडिओद्वारे संवाद साधला.

लॉकडाऊनमुळे हे विद्यार्थी 15 मार्चपासून युनिव्हर्सिटीत अडकले होते. या विद्यार्थ्यांची शनिवारी घरवापसी झाली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी अनिल देशमुख यांचे आभार मानले आहेत. पंजाबमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज नांदेडमध्ये तीन जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यातील दोन जण हे पंजाबमधून नांदेडमध्ये आले होते. (हेही वाचा - ‘महाराष्ट्र सरकार आमच्याशी खोटे बोलले’, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या आरोपानंतर भाजपने साधला सरकारवर निशाणा; ‘शिवसेना गप्प आहे, हा राज्याचा अपमान नाही का?’)

सरकारने लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या लोकांना आपल्या मूळ गावी परतण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे नांदेडहून काही भाविक पंजाबमध्ये परतले होते. त्यापैकी 351 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तसेच नांदेडमध्ये देखील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. नांदेडहून आलेल्या भाविकांमुळे पंजाबमध्ये कोरोना पसरला असल्याचं पंजाब सरकारने म्हटलं आहे. याशिवाय पंजाब सरकारच्या चुकीमुळे नांदेडमध्ये कोरोना पसरला, असा आरोप काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे.