Ganesh Visarjan (Photo Credits: File)

गणपतीच्या विसर्जनाचा (Ganesh Visarjan) दिवस जसजसा जवळ येतोय तसतशी गणेशभक्तांमध्ये विसर्जनासाठी प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. अशा वेळी 7 दिवसांचे आणि 11 दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी जाणा-या गणेश भक्तांच्या आनंदावर विरजण पडू नये म्हणून मध्य रेल्वेच्या (Central Railway) 20 विशेष लोकल सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतलाय.मटा ने दिलेल्या वृत्तानुसार, यात 7 सप्टेंबरला मध्यरात्री आणि 12 सप्टेंबरच्या मध्यरात्री या विशेष फे-या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

आगमन आणि विसर्जन वगळता गणेशोत्सवातील अन्य दिवस सरकारी आणि खासगी कार्यालये सुरू असतात. यामुळे कुटुंबीयांसमवेत गणपती पाहण्यासाठी रात्री उशिरा घराबाहेर पडण्याचा ट्रेंड अलिकडच्या काळात रुजत आहे. यंदा यंदा रविवारी सुट्टी असल्याने शनिवारी बहुतांश मुंबईकर दर्शनासाठी घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. यामुळे संभाव्य गर्दी लक्षात घेता अतिरिक्त लोकल चालवण्याचे नियोजन केले आहे. हेही वाचा- Ganesh Visarjan 2019 Muhurat: यंदा दीड, 5,7 आणि 10 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन करण्याचे मुहूर्त काय?

अलीकडे विसर्जनासाठी आणि बाप्पाचे विसर्जन पाहण्यासाठी चौपाटीवर जाण्या-या मुंबईकरांचा कल वाढत असतानाचे चित्र पाहून मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रात्री उशिरा प्रवास करणा-यांसाठी सीएसएमटी ते ठाणे, सीएसएमटी ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेल अशा मार्गांवर विशेष लोकल चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

हेही वाचा- काही वर्षी गणपतीचं विसर्जन ५ किंवा ७ दिवसांनी का होतं?

तसेच गणरायाच्या विसर्जनासाठी मुंबई पोलिस सज्ज झाली असून, कडक बंदोबस्तात आणि शांततापूर्ण वातावरणात हा विसर्जन सोहळा पार पडावा यासाठी मुंबई पोलिस प्रयत्नशील असतील.