Drowning प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबई (Mumbai) मध्ये वर्सोवाच्या समुद्र किनारी (Versova Beach) 2 तरूण मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना गुरूवार 3 ऑगस्टच्या सकाळची आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिलेल्या माहितीनुसार, मृतांची नावं दीपक बिष्ट वय वर्ष 25 आणि त्याचा चुलतभाऊ हरदेव सिंह वयवर्ष 26 आहे. हे दोन्ही युवक हरयाणाचे आहेत. पोहताना त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. पोलिसांना त्यांची आधारकार्ड्स सापडली आहेत.

दोघांचेही मृतदेह एकमेकांपासून सुमारे 100 मीटर अंतरावर दिसली आहेत. वर्सोवा बीचवर असलेल्या लाईफगार्ड्सना हे मृतदेह दिसले. लाईफगार्डने मृतदेहांची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. या मृतदेहांचे पोस्ट मार्टम करण्यासाठी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे.

वर्सोवा पोलिस स्टेशनच्या अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, मृतांच्या शरीरावर कोणत्याही जबर खूनांची माहिती नाही. त्यांचा मृत्यू बुडून झाल्याचा अंदाज आहे. नक्की वाचा: Mumbai News: मार्वे समुद्रात 5 मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, तिघांचा शोध सुरु .

एका तरूणाच्या खिशामध्ये एक सीम कार्ड आढळलं आहे. यावरून पोलिसांना त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधणं शक्य झालं. हरयाणातील त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीमध्ये हे तरूण नागपूर, चैन्नई मध्ये कामाला होते. मात्र ते मुंबईला कधी आले? याची कल्पना त्यांना नाही. या तरूणांचा मृत्यू अपघाती निधनाने झाल्याचं पोलिसांनी नोंदवून घेतलं आहे. यांच्या मृत्यूमध्ये काही आक्षेपार्ह आहे का? याचा तपास सध्या सुरू आहे.

सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत. अशामध्ये मुंबईत पावसाच्या दिवसात समुद्रकिनार्‍यापासून दूर राहण्याचे आवाहन सातत्याने बीएमसीने केले आहे. प्रामुख्याने भरती-ओहोटीच्या वेळेस समुद्रकिनारी न जाण्याचे आवाहन देखील करण्यात येते.