Pedestrians Killed प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Pixabay)

Navi Mumbai Accidents: नवी मुंबईतील (New Mumbai) तुर्भे स्टोअर परिसरात (Turbhe Store Area) 48 तासांत दोन भीषण अपघात (Accident) घडले आहेत. या अपघातात दोन पादचाऱ्यांचा मृत्यू (Pedestrians Killed) झाला आहे. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी (Turbe MIDC Police) संबंधित वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तथापी, रखडलेले पूल बांधकाम आणि दुर्लक्षित रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. अपघातांच्या मालिकांनंतर येथील रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले असून उड्डाणपूल उभारणीची मागणी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, ठाणे-बेलापूर रोडवर हे अपघात झाले आहेत, जेथे पूर्वेला मोठी झोपडपट्टी आहे. तसेच तुर्भे रेल्वे स्थानक पश्चिम दिशेला आहे, ज्यामुळे ते पादचाऱ्यांसाठी वारंवार क्रॉसिंगचे ठिकाण बनले आहे. उच्च वाहनाचा वेग आणि पादचाऱ्यांच्या अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे याठिकाणी यापूर्वी देखील अनेक अपघात घडले आहेत. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, पादचारी सुरक्षा सुधारण्यासाठी उड्डाणपूल बांधकाम प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. (हेही वाचा - Palm Beach Road Accident: वडिलांचा मृत्यू, आईही रुग्णालयात, चिमुकलीवरील उपचारांचा खर्च 20 लाख रुपये; पाम बीच रोड अपघातग्रस्त कुटुंबाकडून आर्थिक मदतीसाठी आवाहन)

दरम्यान, विलंबित बांधकाम आणि पावसामुळे खराब झालेले रस्ते यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. अलिकडे झालेल्या अपघातात पादचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने स्थानिक नागरिकांनी याठिकाणी त्वरित कारवाईची मागणी केली आहे. शनिवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास एका वेगवान कंटेनर ट्रकने अझरुद्दीन पठाण (30) यांना धडक दिली. यात पठाण यांचा मृत्यू झाला. तर अशाच एका घटनेत रामलाल प्रसाद (60) हे रस्ता ओलांडत असताना त्यांना कंटेनर ट्रकने धडक दिली. (हेही वाचा - Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी बसची ट्रकला धडक; 15 जण जखमी, 8 जणांची प्रकृती गंभीर)

अपघातात मृत्यू झालेले पादचारी हे याच परिसरात राहत होते. त्यामुळे या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. तसेच तातडीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल रहिवाशांनी पुलाच्या कंत्राटदाराला आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. तथापी, याठिकाणी वाहनाचा वेग नियंत्रित करण्यासाठी आणि पादचाऱ्यांचे रक्षण करण्यासाठी तुर्भे स्टोअरमध्ये संभाव्य वाहतूक सिग्नल बसविण्यासह प्रतिबंधात्मक उपायांवर चर्चा करण्यासाठी एक आपत्कालीन बैठक नियोजित करण्यात आली आहे.