Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Suicide In Academy: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका अकॅडमीत स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीने आयुष्य संपवले आहे. 20 फेब्रुवारी रोजी तरुणीने आत्महत्या केली. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना बजाजनदर परिसरात घडली होती. तरुणाने आत्महत्या केल्याचे नेमके कारण समोर आले आहे आणि या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.  हेही वाचा- सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टर विद्यार्थ्याची आत्महत्या,

मिळालेल्या माहितीनुसार, लीना श्रीराम पाटील असं तरुणाचे नाव आहे. लीना सरकरी नोकरीसाठी स्पर्धा परिक्षांची तयारी करत होती त्यासाठी शहरातील Garud Zep Career Academy प्रवेश केला होता. परंतु अॅकडमीत असा काही प्रकार तिच्यासोबत घडला, ज्यामुळे तीने टोकाचे पाऊल उचलले आहे. अॅकडमीत तिच्यासोबत छळ होत असल्याने तिने टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केल्याचे तिच्या वडिलांना उघडकीस केले आहे.

या प्रकरणी मयत तरुणीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांना या प्रकरणात अॅकेडमीच्या पाच जणांविरुध्दात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अॅकेडमीचे संचालक प्रा. नीलेश सोनावणे आणि कर्मचारी तिच्याशी अपमानास्पद वागणून दिली.  तू काळी आहेस.... असंही हिणवले जात होती. तिला सर्व प्रशिक्षणार्थीसमोर अपमानास्पद वागणूक मिळत होती. त्यामुळे ती नैराश्यात गेली आणि टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली.

मंगळवारी लीनाचा मृतदेह बाथरुममध्ये आढळून आला. लिनाने आत्महत्या केल्याचे कुटुंबियांना माहिती दिली.  लीनाच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली.