
Nagpur Violence: नागपूर हिंसाचारातील (Nagpur Violence) 17 आरोपींना पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना 22 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, पोलिसांच्या निवेदनात असेही उघड झाले आहे की, नागपूर हिंसाचारात तब्बल 62 वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेने (VHP) ने केलेल्या निदर्शनांमध्ये पवित्र शिलालेख असलेली 'चादर' जाळल्याच्या अफवांमुळे नागपुरात हिंसाचार उसळला.
नागपूर हिंसाचारातील प्रमुख आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल -
नागपूर हिंसाचारातील सूत्रधार फहीम खान आणि इतर पाच जणांवर देशद्रोह आणि सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोशल मीडियावर काही व्हिडिओ शेअर झाल्यानंतर सुरुवातीला चुकीची माहिती पसरवण्यात आली होती, ज्यामुळे हिंसाचाराला चालना मिळाली आणि अधिक व्हिडिओंनी हिंसाचार उफाळला. (हेही वाचा - Nagpur Violence: औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात हिंसक दंगल; जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनांमुळे वातावरण तापले, CM Devendra Fadnavis यांचे शांततेचे आवाहन (Video))
नागपूरच्या काही भागात संचारबंदी शिथिल -
शहरात हिंसाचार झाल्यानंतर तीन दिवसांनी, गुरुवारी नागपूरच्या काही भागात संचारबंदी उठवण्यात आली किंवा शिथिल करण्यात आली. जमावाच्या संताप आणि हिंसाचारानंतर, कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांती नगर, सक्करदरा, नंदनवन, इमामबाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर पोलिस स्टेशन परिसरात कर्फ्यू लागू करण्यात आला होता. (हेही वाचा - Nagpur Violence: नागपूर हिंसाचार प्रकरणी 8 विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या सदस्यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण)
दरम्यान, पोलिस आयुक्त रविंदर सिंगल यांनी गुरुवारी दुपारी 2 वाजल्यापासून नंदनवन आणि कपिल नगर पोलिस स्टेशन परिसरात कर्फ्यू उठवण्याचे आदेश दिले. तथापि, नागपूरमधील मुस्लिम समुदायाच्या सदस्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही समुदायांच्या प्रतिनिधींना भेटावे.