Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात आज कोरोना बाधितांंच्या संख़्येत पुन्हा मोठी वाढ झाली आहे. आजच्या दिवसभरात एकुण 23,365 नवे रुग्ण आढळले असुन राज्यातील एकुण कोरोनाबाधितांंची संंख्या 11,21,221 वर (COVID 19 Total Cases) पोहचली आहे. कालपासुन राज्यात कोरोनामुळे 474 जणांंचा मृत्यु झाला असुन एकुण कोरोना मृतांंची संख्या 30,883 (Coronavirus Deaths) इतकी झाली आहे. या सगळ्या वाढलेल्या आकडेवारीत एक दिलासादायक माहिती अशी की राज्यात आज दिवसभरात 17,559 रुग्णांंना डिस्चार्ज देण्यात आला आहे यानुसार आजवर कोरोनामुक्त (Coronavirus Recovered Cases) झालेल्या रुग्णांंचा आकडा हा 7,92,832 इतका झाला आहे. सद्य घडीला राज्यात कोरोनाचे 2,97,125 अॅक्टिव्ह रुग्ण (Coronavirus Active Cases) आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य आरोग्य मंंत्रालयातर्फे माहिती देण्यात आली आहे. Abu Azmi Tested COVID19 Positive: महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष व आमदार अबु आझमी यांंना कोरोनाची लागण
राज्य आरोग्य मंंत्रालयाच्या माहितीनुसार, सध्या कोरोना बाधितांंच्या मृतांंचा रेट हा अवघा 2,75% आहे. तर दुसरीकडे कोरोना रिकव्हरी रेट हा 70.71% इतका झाला आहे. राज्यात दिवसागणिक कोरोनाच्या अधिकाधिक चाचण्या घेऊन प्राथमिक स्तरावरच कोरोना रुग्ण शोधण्याची मोहिम राबवली जात आहे. ज्या अंतर्गत राज्यात आजवर 55,06, 276 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यापैकी मुळ पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांंचा टक्का हा 20,36% आहे.
ANI ट्विट
23,365 new #COVID19 cases and 474 deaths reported in Maharashtra today; 17,559 patients discharged. Total cases in the state rise to 11,21,221 including 30,883 deaths and 7,92,832 patients discharged. Active cases at 2,97,125: Public Health Department, Maharashtra pic.twitter.com/QiNePDBLFL
— ANI (@ANI) September 16, 2020
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या, रोज रुग्ण संख्या वाढणार्या, मृतांंचे आकडे वाढणार्या आणि त्याच वेळी सर्वाधिक रिकव्हरी (एका दिवसात) झालेल्या राज्यांंच्या यादीत महाराष्ट्र टॉप वर आहे.