Abu Azmi Tested COVID19  Positive: महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष व आमदार अबु आझमी यांंना कोरोनाची लागण
SP MLA Abu Azmi | (Photo Credits-Facebook)

महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party Maharashtra)  अध्यक्ष अबु आसिम आझमी (Abu Azmi)  यांंना सुद्धा कोरोनाची लागण (Coronavirus)  झाल्याचे समजत आहे. याबाबत स्वतः आझमी यांंनी ट्विट करुन माहिती दिली आहे, मागील काही दिवसांंपासुन माझी तब्येत बिघडत असल्यासारखे वाटत होते, अशावेळीखबरदारी म्हणुन मी कोरोनाची चाचणी करुन घेतली आणि माझे कोरोना चाचणी अहवाल आता पॉझिटिव्ह आले आहेत, असे आझमी यांंनी ट्विट मध्ये म्हंंटले आहे. मी सध्या ठीक आहे आणि डॉक्टरांंच्या सल्ल्यानुसार उपचार आणि काळजी घेत आहे असेही आझमी यांंनी पुढे सांंगितले आहे. दरम्यान मागील काही काळात आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांंनी आपआपली चाचणी करुन घ्यावी आणि योग्य ती सर्व काळजी घ्यावी असे आवाहनही आझमी यांंनी केले आहे. महाराष्ट्र पोलिस दलात 24 तासांत 247 जणांना कोरोनाची लागण दोघांचा मृत्यू

अबु आझमी हे मुंंबईच्या मानखुर्द शिवाजीनगर मधुन निवडुन आलेले आमदार आहेत तर यापुर्वी त्यांंनी राज्यसभा खासदारपदही मिळवले होते. Coronavirus: 10 रुग्ण कोरोना व्हायरस पॉझिटीव्ह आढळल्यास इमारत सील करणार, मास्क नसल्यास 200 रुपये दंड- मुंबई महापालिका

अबु आझमी ट्विट

दरम्यान महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांना,मंंत्र्यांंना कोरोनाची लागण होऊन गेली आहे. जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे ही त्यातीलच काही नावे.. अलिकडेच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या आधी सुद्धा अनेक आमदारांंना कोरोना झाल्याचे समोर आले होते.