File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण एकट्या मुबंईत (Mumbai) आढळू आले आहेत. ज्यामुळे राज्य सरकारनकडून ठोस पावले उचलली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी (Domestic Passengers) नियमावली ठरवून दिली आहे. ज्यात होम क्वारंटाइनचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या बिहारचे आयपीएस विनय तिवारी यांना होम क्वारंटाइन करण्यात अल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने ट्विटरच्या माध्यमातून देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशाला 14 दिवस होम क्वारंटाइन करणे सक्तीचे आहे. तसेच होम क्वारंटाइनमधून सूट मिळवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना 2 दिवस अगोदर मुंबई महानगरपालिकेच्या सक्षम प्राधिकारी यांच्याकडे नियमावलीनुसार अर्ज करणे आवश्यक आहे, असे मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. हे देखील वाचा- Coronavirus: राज्यात आज दिवसभरात कोरोना संक्रमित 11,514 रुग्णांची नोंद, 316 जणांचा मृत्यू

मुंबई महानगरपालिकेचे ट्विट-

 

मुंबईत गुरुवारी संध्याकाळी आणखी 910 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 57 जणांचा मृत्यू झाली आहे. ज्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 20 हजार 165 वर पोहचली आहे. यापैकी 6 हजार 545 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 92 हजार 661 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईत 20 हजार 562 ऍक्टिव्ह रुग्ण राहिले आहेत.