Coronavirus: ठाण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली; जिल्ह्यात आज 1 हजार 323 नव्या रुग्णांची नोंद, 40 जणांचा मृत्यू
Coronavirus | (Photo Credits: Pixabay.com)

महाराष्ट्रातील ठाणे (Thane) जिल्ह्यात कोरोना विषाणूचे (Coronavirus) जाळे मोठ्या वेगाने पसरत चालले आहे. ठाण्यात आज 1 हजार 323 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 70 हजार 513 वर पोहोचली आहे. यापैकी 1 हजार 967 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सातत्याने वाढणारा कोरोना बाधितांचा आकडा पाहता काही दिवसांपूर्वी दोन टप्प्यांमध्ये ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली येथे लॉकडाऊनचे अधिक काटेकोर पद्धतीने पालन करण्याचे आदेश पालिका प्रशासनाकडून देण्यात आले होते. ज्यानंतर आता सोमवारपासून हे लॉकडाऊन अंशत: शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यासाठीची नियमावलीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे.

केंद्र आणि राज्य शासनाने जून महिन्यात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर या शहरांमधील बाजारपेठा आणि दुकाने सुरू करण्यात आली होती. मात्र, लॉकडाऊन शिथिलीकरणानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याचा दावा करत पालिका आणि जिल्हा प्रशासनाने पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला लागू . लॉकडाऊनमुळे करोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याचे अंदाज वर्तविले जात होते. प्रत्यक्षात ही संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. हे देखील वाचा- COVID19 Cases in Dharavi Today: मुंबई येथील धारावीची कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू; परिसरात आता केवळ 151 ऍक्टिव्ह रुग्ण

पीटीआयचे ट्विट-

महाराष्ट्रात आज तब्बल 8 हजार 369 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 246 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 27 हजार 31 वर पोहचली आहे. यापैकी 1 लाख 82 हजार 217 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, राज्यात सध्या 1 लाख 32 हजार 236 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत.