Mumbai. (Photo Credit: PTI)

मुंबई (Mumbai) येथील धारावी (Dharavi) परिसरात कोरोना विषाणूचे (Coronavirus) जाळे मोठ्या वेगाने पसरत चालले आहे. धारावीत आज कोरोनाचे आणखी 10 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 502 वर पोहोचली आहे. ‘मिशन धारावी’च्या यशामुळे कोरोनाचे उच्चाटन होण्याच्या दिशेने धारावीची वाटचाल सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असे बिरुद मिरवणाऱ्या धारावीमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर सरकारी यंत्रणेचे धाबे दणाणले होते. मात्र, गेल्या काही दिवासांपासून या भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे.

कोरोना प्रादर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाकडून यापूर्वीच धारावी परिसराची नाकेबंदी करण्यात आली होती. तसेच येथील अनेक परिसर सील करण्यात आले होते. मुस्लिम नगर आणि मुकूंदनगरमध्ये आतापर्यंत कोरोनाच सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत डॉक्टरांच्या पथकांकडून धारावीतील हजारो लोकांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे. यामध्ये कोरोनाचा संभाव्य धोका असलेल्या लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाईन करण्यात आले आहे. धारावीसह दादर आणि माहीम परिसरातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. धारावी सारख्या दाट वस्ती असलेल्या परिसरात कोरोनावर नियंत्रण मिळविण्या मुंबई महानगरपालिकेला यश आले आहे. आनंदाची बाब म्हणजे धारावी परिसरात आता केवळ 151 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. हे देखील वाचा-धक्कादायक! पिंपरी-चिंचवड येथील कोरोना विषाणू पॉझिटिव्ह महिलेचा प्रताप; होम क्वारंटाईन असूनही पुण्याहून विमानाने दुबईत पलायन, गुन्हा दाखल

एएनआयचे ट्वीट-

गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णवाढीचा दर मंदावल्याचे संकेत मिळाल्यामुळे धारावीकरांसाठी सुरू करण्यात आलेल्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रांपैकी दोन केंद्रे अखेर बंद करण्यात आली आहेत. एकेकाळी मुंबईतील कोरोनाचे अतिसंक्रमित क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे विभाग आता आटोक्यात आल्याचे चित्र आहे. वरळी, वांद्रे, भायखळा, नागपाडा, कुर्ला, माटुंगा, वडाळा, देवनार, मानखुर्द हे भाग आता रुग्णवाढीत सगळ्यात खालच्या क्रमांकावर आले आहेत.