Mumbai: गोरेगावमध्ये 20 व्या मजल्यावरच्या बाल्कनीतून पडून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू
Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Mumbai: मुंबईत अत्यंत धक्कादायक प्रकार उघकीस आला आहे. गुरुवारी, रात्री 8:15 च्या सुमारास मुंबईतील गोरेगाव (Goregaon) येथे 13 वर्षांचा मुलगा त्याच्या राहत्या घराच्या 20 व्या मजल्यावरील बाल्कनीतून पडला. यात मुलाचा मृत्यू झाला आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) यासंदर्भात माहिती दिली आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, इयत्ता सहावीचा विद्यार्थी त्याच्या बेडरूमच्या बाल्कनीत खेळत असताना त्याचा तोल गेला आणि तो पडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी मुलाचे वडील कामानिमित्त पोर्तुगालला गेले होते, तर आई स्वयंपाकघरात होती. अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा रक्षकाने वरच्या मजल्यावर येऊन मुलाच्या आईला घटनेची माहिती दिली. (हेही वाचा -UP Shocker: कलयुगी आईने सॅनिटायझर टाकून पोटच्या मुलीला जिवंत जाळले; जाणून घ्या काय होता चिमुरडीचा गुन्हा)

रुग्णालयात नेल्यानंतर मुलाला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. यानंतर, आरे पोलिसांना सूचित करण्यात आले आणि त्यांनी अपघाती मृत्यू अहवाल (ADR) नोंदवला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबातील सदस्यांनी कोणताही संशय व्यक्त केला नाही. त्यामुळे एडीआर दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.