cheating in exam PC twitter

बारावीच्या परिक्षेत आता पर्यंत अनेक गैरप्रकार होताना पाहिले असतील, शिक्षण क्षेत्राने उपाययोजना केल्या तरी बाराबीच्या पेपरमध्ये कॉपी पुरवण्याचा प्रकार काही थांबेना. दरम्यान महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात एका भावाने शक्कल लढवत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु तो या प्रकरणात फसला. तरुणाने परिक्षा केद्रांवर कॉपी पुरवण्यासाठी नकली पोलिस बनला आहे. या घटनेनंतर बारावी परिक्षा केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता. ( हेही वाचा- 21 फेब्रुवारीपासून सुरू होतेय बारावीची परीक्षा,)

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील पातूर शहरातल्या शाहबाबू उर्दु हायस्कूल येथे बारावीच्या परिक्षा सुरु आहेत. या परिक्षा केंद्रावार काल 21 फेब्रुवारी रोजी एक तरुणाने चक्क पोलिसांचा गणवेश परिधान करून बहिणीला कॉपी पुरविण्यासाठी आला होता. नकली पोलिसाचं सल्यूट करतानाच बिंग फुटलं आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला. अनुपम मदन खंडारे (वय वर्ष २४) असं नकली पोलिस बनलेल्या तरुणाचे नाव आहे. तो पांगरा बंदी येथील रहिवासी आहे.

परिक्षा केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. दरम्यान पातूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक किशोर शेळके हे परिक्षा केंद्रावर हजर झाले. त्यावेळी पोलिस निरिक्षकाला सॅल्युट करताना अनुपम खंडारे यांचावर संशय आला. त्याची नेम प्लेट देखील चुकीची होती. त्यामुळे पोलिसांनी त्याला बाजूला घेऊन झडती घेतली. पॅन्टच्या खिशात इंग्रजी विषयाच्या कॉप्या सापडल्या. चौकशी करताच पोलिसांना समजले की, परिक्षा केंद्रावर त्याची बहिण परिक्षा देण्यास आली होती. हा सर्व प्रकार कॉपीचा असल्याचे समजल्याने तरुणावर ४१७, ४१९, १७०, १७१ आणि अधिनियम १९८२ चे कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आले. या प्रकरणी पुढील चौकशी सुरु आहे.