Voter ID (Photo Credit: Twitter)

मतदार ओळखपत्र (Voter ID) हे अतिशय महत्वाचे कागदपत्रे म्हणून ओळखले जाते. मात्र, ठाणे (Thane) जिल्ह्यातील उल्हासनगर (Ulhasnagar) येथील 117 मतदारांचे ओळखपत्र कचऱ्यात फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे भेटलेले सर्व मतदार ओळखपत्र उल्हासनगर विधानसभा क्षेत्रातील आहे. जिल्हा अधिकाऱ्यांनी रविवारी याबाबत माहिती दिली आहे. हे सर्व मतदार ओळखपत्र कोणी फेकले? याचा शोध घेतला जात आहे. तसेच या मतदार ओळख पत्राद्वारे कोणता गैरप्रकार तर, घडला नाही? याबाबतही चौकशी केली जात आहे. याप्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर पकडले जाईल, असा विश्वासही पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मतदार ओळखपत्र फेकल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. "ही ओळखपत्र कुणी फेकले असेल याची मतदार यादीची छाननी केली जात आहे. 21 जानेवारीच्या प्रभावी तारखेसह ठाणे जिल्ह्यात मतदार यादीची उजळणी केली जात आहे. जुनी ओळखपत्र फेकून देण्याशी संबंधित आहे की नाही याची चौकशी केली जात आहे. ” असे जिल्हा अधिकाऱ्याने सांगितले आहे. हे देखील वाचा- Dress Code For Govt Employees in Maharashtra: सरकारी कर्मचाऱ्यांनाही आता ड्रेसकोड लागू; शासकीय कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत? घ्या जाणून

मतदार ओळखपत्र यापुढे आता डिजिटल होणार आहे. डिजिटल वोटर आयडी कार्डचा प्रस्ताव समोर आला असून निवडणूक आयोग यावर विचार करत आहे. पुढच्या वर्षी पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पॉंडेचेरी निवडणुकीत याचा उपयोग केला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. निवडणूक आयोगाचा यावर विचार सुरु आहे.