Coronavirus Cases In Mumbai: मुंबईमध्ये आज 1 हजार 66 नवे कोरोनाबाधित रुग्ण, तर 48 जणांचा मृत्यू
Coronavirus in India | (Photo Credits: PTI)

Coronavirus Cases In Mumbai: राज्यात आज आतापर्यंतच्या सर्वोच्च संख्येने 13 हजार 348 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अशातचं आज मुंबईमध्ये 1 हजार 66 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 48 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 23 हजार 397 वर पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत मुंबईतील 96 हजार 586 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या मुंबईमध्ये 19 हजार 718 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, आतापर्यंत 6 हजार 796 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे. (हेही वाचा - Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार; राज्यात दिवसभरात 12 हजार 248 नव्या रुग्णांची नोंद, 390 जणांचा मृत्यू)

दरम्यान, आज राज्यात दिवसभरात 12 हजार 248 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 390 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण 68.25 टक्के एवढे आहे. सध्या 1 लाख 45 हजार 558 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज राज्यभरात सर्वाधिक 78 हजार 70 चाचण्या करण्यात आल्या आहेत, यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.