BMC: मुंबईत एकूण 33 हजार 835 जणांना कोरोनाची लागण; गेल्या 24 तासात 1 हजार 44 नव्या रुग्णांची नोंद तर, 32 मृत्यू
प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

कोरोना विषाणूचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून योग्य ते निर्णय घेतले जात आहेत. मात्र, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अद्यापही सकारात्मक बदल दिसून आला आहे. मुंबईत (Mumbai) आज 1 हजार 44 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 32 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 33 हजार 835 वर पोहचली आहे. यापैंकी 1 हजार 97 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरुवातीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात जमावबंदी कायदा लागू केला होता. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसांकरिता लॉकडाउन घोषीत करण्यात आला होता. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन 31 मेपर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आला आहे. मात्र, तरीही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. हे देखील वाचा- Coronavirus: बुलडाणा जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

एएनआयचे ट्वीट-

भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यात आज 2 हजार 190 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 105 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 56 हजार 948 वर पोहचली आहे. यापैकी 1 हजार 897 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 17 हजार 918 जणांनी कोरोनावर मात केली आहे.