Operation | Pixabay.com

वसई च्या एका 10 वर्षीय मुलीला परेलच्या वाडिया हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. पोटदुखी आणि सतत उलट्या होत असल्याचा त्रास जाणवू लागल्याने तिला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. मुलीला मागील 20 दिवसांपासून सतत त्रास होत होता. यामध्ये तिचं वजन कमी झालं होतं. बद्धकोष्ठतेचा त्रास होत होता. डॉक्टरांनी तिचं स्कॅनिंग केल्यानंतर पोटात 50 सीएम चा चा केसांचा गोळा असल्याचं समोर आलं. केसांचा हा गोळा तिच्या पोटात लहान आतड्याजवळ होता.

हॉस्पिटल मध्ये दाखल केलेल्या मुलीला तिचे केस खाण्याचा विचित्र आजार होता. त्यामुळे पोटात हा केसांचा गोळा जमा झाला होता. तिचा हा आजार पालकांच्या लक्षात आला नव्हता. Times of India,च्या रिपोर्टनुसार, मुलीला trichophagia हा आजार होता. हा एक मानसिक आजार आहे. यामध्ये रूग्ण स्वतःचेच केस खातात. यामध्ये गुंतागुंत वाढल्यास Rapunzel syndrome होतो. यामध्ये केसाचा गोळा मोठा होऊन तो पोटातून लहान आतड्यात पसरतो. त्याच्यावर उपचार करणं आवश्यक आहे. अन्यथा गंभीर परिणाम होऊ शकतात. 10 वर्ष तरूणी खात होती स्वतःचेच केस, जे जे हॉस्पिटल्स मध्ये 22 वर्षीय तरूणीच्या पोटातून काढला 770 ग्रॅम केसांचा बोळा .

Trichophagia आणि Rapunzel Syndrome म्हणजे काय?

Trichophagia या आजारामध्ये रूग्णांना स्वतःचेच केस खाण्याची सवय असते. यामध्ये काहींना स्वतः चे केस उपटून खाण्याच्या इच्छेवर नियंत्रणही राहत नाही. जगभरात या आजाराचे 1-2% रूग्ण आहेत. हा आजार किशोरवयीन मुली आणि तरूण स्त्रियांमध्ये अधिक आढळतो. केसांचा गुंता पोटात वाढत गेला की त्याचे रूप गंभीर होते आणि Rapunzel syndrome बळावतो.

Rapunzel syndrome ही trichophagia ची एक दुर्मिळ गुंतागुंत आहे. यामध्ये केस पोटापासून लहान आतड्यात पसरल्याने एक मोठे हेअरबॉल तयार करतात आणि ते वेणीसारखे दिसतात, म्हणून हे नाव रॅपन्झेल या परीकथेच्या पात्राकडून घेण्यात आले आहे. जगभरात रॅपन्झेल सिंड्रोमची 100 पेक्षा कमी प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यामुळे ही एक अपवादात्मक दुर्मिळ स्थिती आहे. गुंतागुंतांमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये अडथळा, गंभीर कुपोषण, वजन कमी होणे आणि अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये, जीवघेणा परिस्थिती यांचा समावेश असू शकतो.