World Hijab Day 2019: 'विश्व हिजाब दिवस' 1 फेब्रुवारी  दिवशी साजरा करण्याची सुरूवात कशी झाली?  मुस्लिम महिला हिजाब आणि बुरखा घालण्यामागील नेमकं कारण काय?
विश्व हिजाब दिवस 2019 (Photo Credits: Twitter)

World Hijab Day 2019: जगभरात मुस्लीम महिला, तरूणी 1 फेब्रुवारी हा दिवस विश्व हिजाब दिवस (World Hijab Day) म्हणून साजरा करतात. मुसलमान महिलांच्या आयुष्यात हिजाबचं एक खास वैशिष्ट्य असतं. हिजाब डे साजरा करून मुसलमान महिला त्यांच्या धर्माबद्दल एकजुटता दाखवतात. 1 फेब्रुवारी या दिवशी हिजाब (Hijab) घालून या महिला त्यांच्या उज्ज्वल भविष्याकडे वाटचालीसाठी एक पाऊल पुढे येतात. त्यांच्यासाठी हिजाब कोणता अडथळा नव्हे तर एक गिफ्ट आहे.

हिजाब दिवसाची सुरूवात कशी झाली ?

विश्व हिजाब दिवसाची सुरूवात 1 फेब्रुवारी 2013 या दिवसापासून झाली. त्याचे श्रेय नजमा खान या महिलेला जातं. नजमाने सामाजिक बदल आणि मुस्लिम महिलांना प्रेरणा देण्यासाठी या खास दिवसाची सुरूवात केली. याद्वारा मुस्लिम महिलांमध्ये एकात्मकेची भावना निर्माण केली जाते. आज डिजिटलायझेनशच्या काळात हिजाब परिधान करून महिला सेल्फी क्लिक करतात तो सोशल मीडियात शेअर करतात. यामुळे अधिकाधिक महिला प्रेरित होतील अशी त्यामागे संकल्पना आहे. या अभियानाद्वारा मुसलमान महिलांना संघटीत, सशक्त आणि प्रेरणादायि बनवणं हा उद्देश आहे.

मुसलमान महिला हिजाब का घालतात?

सामान्यपणे मुसलमान महिला बुरखा आणि हिजाब घालतात. पण मुसलमान महिला बुरखा घालण्यामागील खरं कारण तुम्हांला 'कुराणा'मध्ये सापडेल. मुस्लिम बांधवांचा पवित्र ग्रंथ म्हणजे कुराण. कुराणामध्ये सांगितल्यानुसार, महिलांचा पोषाल्ह असा असावा ज्यामध्ये त्यांचे डोळे, हात, पाय परपुरूषाला दिसता कामा नये. म्हणूनच बुरखा घालून शरीर आणि हिजाब घालून चेहरा झाकला जातो.

हिजाब या शब्दाचा अरबी भाषेमध्ये अर्थ होतो की डोकं झाकणं. यामुळे चेहरा दिसतो पण केस आणि मान लपली जाते. पश्चिमी देशामध्ये हिजाब अधिक प्रमाणात वापरतात तर आशियाई देशांमध्ये बुरखा वापरतात.