Pune - Singapore Direct Flight : आजपासून पुणेकरांना Jet Airways ची थेट सिंगापूर स्वारी, पहा तिकिटांची खास सवलत
Jet Airways | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

Pune and Singapore Direct Flight : जेट एअरवेजने (Jet Airways) आजपासून पुणे सिंगापूर (Pune Singapore ) थेट विमान सेवा केली आहे. जेट एयरवेज ही पुणेकरांना सिंगापुर पर्यंत थेट सेवा देणारी पहिली आणि एकमेव विमान कंपनी आहे. नियमित 9 विमानं पुणे -सिंगापूर रोज प्रवास करणार आहेत. आज पहाटे 5:15 वाजता पाहिलं विमान सिंगापूरकडे झेपावलं . सिंगापूरला हे विमान दुपारी 1:15 वाजता पोहचेल. रात्री 9 वाजता सिंगापूरहून निघणारे विमान पहाते 5 वाजता पुण्यात लॅन्ड करणार आहे.

जेट एअरवेजने सुरुवातीला जाहीर केलेल्या विमान सेवेच्या दरांची किंमत रिटर्न प्रवासासाठी 21,500 रुपये ( इकॉनॉमी क्लास) आणि 65,500 रुपये (बिझनेझ क्लास) इतके आकारण्यात आले आहे.

पुण्यातून 2017 साली सुमारे 37,000 प्रवासी सिंगापूरला प्रवास करत असल्याचं समोर आलं होत मात्र त्यांना मुंबई हुन प्रवास करावा लागत होता. मात्र आता जेट एअरवेजच्या या नव्या सुविधेमुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. सिंगापूर हुन ऑस्ट्रेलिया, बाली, न्यूझीलंड येथे प्रवासी जातात. त्यासाठी देखील एअर लाईनने खास सवलत ठेवली आहे.