
जून महिना खगोल प्रेमींसाठी खूप खास असणार आहे. या महिन्यात चंद्र आणि सूर्य दोन्ही ग्रहण नागरिकांना बघता येणार आहे. यावर्षी येत्या 5 जून रोजी वर्षातील दुसरे चंद्रग्रहण लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2020 वर्षात एकूण 6 ग्रहण लागणार आहेत. त्यात 2 सूर्यग्रहण आणि 4 चंद्रग्रहणाचा समावेश आहे. यातील दुसरे ग्रहण येत्या 5 जूनला आहे. हे चंद्रग्रहण आहे. तर दुसरे सूर्य ग्रहण असून ते येत्या 21 जूनला दिसणार आहे. जून महिन्यातील हे दोन्ही ग्रहण भारतात दिसणार आहे. पाच दिवसांनंतर येणारे चंद्रग्रहण भारतासोबतच यूरोप, आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्येही दिसणार आहे. तर २१ जूनला होणारे सूर्यग्रहण भारत, दक्षिण पूर्व यूरोप आणि आशियामध्ये दिसणार आहे.
ज्योतिषांच्या मते यावर्षी लागणारे हे ग्रहण खूप महत्त्वाचे आहे. विशेष करून 21 जूनला येणाऱ्या सूर्यग्रहणावर ज्योतिषांचे विशेष लक्ष आहे. कारण हे ग्रहण मिथुन राशीत असणार आहे. मिथुन राशींच्या व्यक्तींवर या ग्रहणाचा विशेष परिणाम होणार आहेत. हे देखील वाचा- राशीभविष्य 2 जून 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
चंद्रग्रहणाची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे-
- 5 जूनला असणारे चंद्र ग्रहण तब्बल 3 तास 18 मिनीटांचे आहे.
- हे चंद्र ग्रहण 5 जूनला रात्री 11.15 मिनिटांनी सुरू होईल.
- मध्यरात्री 12.54 मिनिटांनी याचा सर्वाधिक परिणाम बघितला येईल.
- 6 जून मध्यरात्री २.३४ मिनिटांनी ग्रहण संपणार आहे.
सूर्यग्रहणाची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे-
- 21 जूनला सुर्यग्रहण असेल.
- सकाळी 9. 15 मिनिटांनी सुरू होईल.
- दुपारी 12. 10 वाजता ग्रहणाचा मध्यकाळ असेल
- दुपारी 3.04 मिनिटांनी ग्रहण संपणार आहे
- ग्रहणाचा सूतक काळ 12 तास पूर्वीच सुरू होईल.
जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण ही एक पूर्णत वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. एरवी पृथ्वीची गडद छाया चंद्रावर पडत असल्याने ते खग्रास किंवा खंडग्रास ग्रहण असते. पण, जेव्हा चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेतून प्रवास करतो तेव्हा त्या ग्रहणाला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात.