Sex दरम्यान महिला विशिष्ट आवाज काढून पार्टनरला देतात 'हे' सकारात्मक संकेत; जाणून घ्या सविस्तर
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

सेक्स दरम्यान पुरुष आणि महिला विशिष्ट आवाज काढतात हे आपल्यापैकी अनेकांना माहित असेलच.किंबहुना अनेक सिनेमांमधूनही तसच दाखवलं जातं. मात्र त्यावेळी काही जण याला घाणेरडा प्रकार म्हणून घेतात तर काही हसण्यावारी म्हणजेच गंमतीचा भाग म्हणून घेतात. मात्र असे विचित्र आवाज काढणे ही नैसर्गिक क्रिया असून सेक्स दरम्यान आलेली त्वरित प्रतिक्रिया असते. त्यात दोन्ही जोडीदार सेक्स किती छान एन्जॉय करतात हेच कळते. त्यामागे कोणत्याही हसण्याचा विषय नसून ती केवळ एखाद्या क्रियेला दिलेली प्रतिक्रिया असते. रिसर्च अनुसार महिला सेक्स दरम्यान आवाज काढण्याचे वेगळेच आणि काही खास कारणं आहेत असे समोर आले आहे.

सर्वेनुसार, ज्या महिला सेक्सदरम्यान वेगवेगळे आवाज काढतात त्या महिला सेक्स खूप छान एन्जॉय करतात असे दिसून आलं आहे. मात्र या गोष्टीचा अंदाज लावणे कठीण आहे की महिला कधी खरे आणि कधी खोटे आवाज काढतात. जाणून घेऊयात या आवाजांचे संकेत:

1. सेक्स दरम्यान होणा-या वेदनेला आनंदात बदलण्यासाठी

एक्सपर्ट्स नुसार काही महिला सेक्स दरम्यान होणा-या वेदना कमी करण्यासाठी आवाज काढतात.

2. आपल्या पार्टनला आणखी उत्तेजित करण्यासाठी

ब-याचदा महिला सेक्स दरम्यान थकलेल्या असतात अशा वेळी आपला पार्टनर लवकर उत्तेजित व्हावा यासाठी त्या विशिष्ट आवाज काढतात.

हेदेखील वाचा- Sex Tips: सेक्सचा अनुभव आणखी रोमँटिक करण्यासाठी चुंबनाद्वारे खेळा हे '5' मजेशीर गेम्स

3. Orgasm एन्जॉय करण्यासाठी

जेव्हा महिला सेक्स दरम्यान परमोच्च सुखाचा आनंद अनुभवत असतात तेव्हा त्या विशिष्ट पद्धतीचे आवाज काढून त्याबाबत आपली पसंती दर्शवितात. हा चांगल्या सेक्स लाईफसाठी उत्तम पर्याय आहे.

4. पार्टनरला आपली सहमती दर्शविण्यासाठी

बहुतेक महिला आपल्या सेक्सचा अनुभव आपल्या पार्टनरपर्यंत पोहोचविण्यासाठी विशिष्ट पद्धतीचे आवाज काढतात.

सेक्स दरम्यान महिलांनी आवाज काढणे हे विचित्र नसून त्या मागे काही कारणे आहेत हे समजून घ्या आणि सेक्सचा आनंद घ्या.