Sex Tips: सेक्सचा अनुभव आणखी रोमँटिक करण्यासाठी चुंबनाद्वारे खेळा हे '5' मजेशीर गेम्स
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

सेक्स ही एक अशी गोष्ट आहे ज्यात तोच तोच पणा आल्यास ते कंटाळवाणे होऊ लागते. आपल्या जोडीदाराकडून अनेकदा अशा तक्रारी असतात की समोरचा सेक्स दरम्यान इतका उत्साही नसतो वा सेक्स लाईफ Bore झाली असते. याचे मुख्य कारण सेक्समध्ये आलेला तोच तोच पणा हे असते. अशा वेळी तुम्ही घरातील वेगवेगळ्या जागांचा सेक्ससाठी वापर करता किंवा कुठे बाहेर आऊटिंग जाता. जेणेकरुन तुमच्या पार्टनरचा त्या वातावरणात चांगला मूड बनेल आणि सेक्सचा चांगला अनुभव घेता येईल. मात्र दरवेळी या गोष्टी करणे शक्य होईलच असे नाही. अशा वेळी तुम्ही00 आहे त्या ठिकाणी अथवा तुमच्या बेडरुममध्ये काही वेगळे प्रकार ट्राय करु शकता.

सेक्सची सुरुवात किंवा शारीरिक संबंध ठेवताना सर्वात आधी ओठांचे चुंबन घेतले जाते. ही गोष्ट इतकी खास असते त्यामुळे सेक्सबाबतीत अनेक संवेदना निर्माण होतात. अशा या चुंबनाचे '5' मजेशीर प्रकार ट्राय केल्यास तुमच्या सेक्सचा अनुभव आणखीनच रोमँटिक होईल.

1. कँडी/चॉकलेट गेम

या खेळात डोळ्यांना पट्टी बांधून हातात कँडी/चॉकलेट घ्या. दोन्ही बाजूने जोडीदारांनी ही कँडी संपवण्याचा प्रयत्न करा त्यानंतर एक छान फ्रेंच किस घेऊन छान मूड बनवता येईल.

2. पिन द प्लस

यात तुमच्या जोडीदाराच्या डोळ्यांना पट्टी बांधा आणि त्याच्यापासून थोडे लांब अंतरावर उभे राहा. नंतर त्याला तुमच्या शरीराचे एक एक भाग सांगून त्या भागांना त्याला स्पर्श करायला सांगा. यात तुम्च्यातील दुरावा दूर होईल. Sex Tips: Boring सेक्स लाईफ Interesting करण्यास मदत करतील या '5' भन्नाट आयडियाज

3. ओपन आय गेम

या गेममध्ये तुमच्या जोडीदाराला स्मूच करताना डोळे बंद करायचे नाहीत. तुमच्या दोघांपैकी ज्याचे डोळे जास्त वेळ किस करताना उघडे राहतील ती व्यक्ती जिंकेल. यामध्ये जो जिंकेल त्याच्या मनाप्रमाणे तुम्ही पुढे सेक्स करायचं. खूपच इंटरेस्टिंग वाटणारा हा गेम नक्की ट्राय करा

4. फ्रूटी किस

या गेममध्ये केळं, सफरचंद अथवा संत्र यासारखी फळं तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आणि तुमच्या ओठांवरमध्ये होल्ड करून ठेवायची आहेत आणि हळूहळू दोन्ही बाजूंनी हे फळ चावायचं आहे. लास्ट बाईटनंतर काय होणार हे तुम्हाला माहीतच आहे.

5. रेड लस्ट

या गेममध्ये तुम्हाला म्युझिकवर केवळ तुमच्या जोडीदाराला नाचवयाचं नाहीये तर म्युझिक प्लेअरची कमांड पण तुम्हाला तुमच्या हातात ठेवायची आहे. तुम्ही न बघता गाणं स्टॉप करा आणि तुमच्या जोडीदाराला असेल त्या पोझिशनमध्ये स्टॅच्यू व्हायचं आहे. त्याच पोझिशनमध्ये तुम्ही त्याना स्मूच करायचं आहे.

आहेत ना मजेशीर खेळ. नुसती कल्पना जरी केली तरी अंगावर रोमांच उभे राहतील. नक्की हा गेम तुम्ही ट्राय करा