'या' 5 इशाऱ्यांवरुन ओळखा तुमच्याशी समोरचा व्यक्ती फ्लर्ट करतोय
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

कोणाचे तरी लक्ष आपल्या बाजूला आकर्षित करण्यासाठी किंवा त्या व्यक्तिला तुम्ही मला आवडता हे सांगण्यासाठी लोक फ्लिर्टिंग करण्याचा मार्ग अवलंबतात. तसेच फ्लर्ट करणारी व्यक्ती आपल्याच आजूबाजूला कधी कधी वावरत असते. त्यामुळे तो व्यक्ती सातत्याने आपल्याकडे पाहत असल्याचे आपल्याला पटकन कळून येते. मात्र समोरची व्यक्ती काही न बोलता फक्त काही इशाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याकडे वारंवार पाहत असते. तर या 7 इशाऱ्यांवरुन ओळखा तुमच्याशी समोरचा व्यक्ती तुमच्याशी फ्लर्ट करत आहे.

वारंवार स्वत: सिंगल म्हणवणे

जर कोणताही समोरचा व्यक्ती तुम्हाला मी रिलेशनशिप मध्ये नाही. सिंगल आहे असे सांगत असेल अथवा तुम्ही माझ्यासोबत फिरायणा येणार का असे विचारुन तुमच्याशी फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करत असते.

अचानकपणे स्पर्श करणे

स्पर्श करणे म्हणजे कोणताही व्यक्ती तुम्हाला चालता चालता स्पर्श करेल. मात्र एखादी व्यक्ती प्रेमाच्या भावनेने हळुवार अचानक स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असल्यास या बाबतचे संकेत मिळतात.

व्यक्तिमत्व

काही व्यक्ती अशा असतात त्यांच्या शब्दातून नाही तर त्यांच्या हावभाव किंवा व्यक्तिमत्वातून तुमच्याशी फर्ट करत असल्याचे दाखवून देतात. जर तु्म्ही सुद्धा त्या व्यक्तिला सकारात्मकपणे उत्तर देत असाल तर तुम्हाला ही ती व्यक्ती आवडते असे मानले जाते.

वारंवार चिडवणे

काही व्यक्ती आपल्यासोबत बोलण्यास पाहतात. मात्र मनातील गोष्ट सांगण्यास लाजतात. तसेच काही वेळा आपल्याशी खोडकरपणे वागून आपले ध्यान त्यांच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. अशा स्थितीत ती व्यक्ती तुम्हाला खड्याळ स्वभावातून फ्लर्ट करत असल्याचे संकेत देत असते.

डोळे

काही लोक फक्त डोळ्यांतून त्यांच्या भावना तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत असतात.

जर एखाद्या व्यक्तीकडून तुमच्या पर्यंत वरील दिलेले फ्लर्ट करण्याबाबत संकेत येत असतील तर विचार करा.