सेक्स करताना तुम्हाला वेदना होतात का? जाणून घ्या त्यामागची कारणं
Vaginal Swelling After Sex | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

Pain During Sex: सेक्स करण्यासाठी कोणताही काळ किंवा वेळ महत्त्वाची नाही. कारण सेक्स काण्यात महत्त्वाचे असते ती त्या मागची भावना. सेक्ससाठी तुमची शारीरिक आणि मानसिक तयारी असणेही तितकेच गरजेचे असते. परंतु, काहींना सेक्स करताना वेदना होत असल्यामुळे त्या गोष्टीचा गोड अनुभव पूर्णपणे घेता येत नाही. त्याची नक्की काय कारणं असू शकतात ते आज आपण जाणून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेक्स करताना तुम्हाला जास्त त्रास होत असेल किंवा तुम्हाला दुखत असेल तर त्यासंदर्भात संकोच न करता बोलणं अत्यंत गरजेचं आहे.

तुम्ही सर्वात आधी तर डॉक्टरकडे जाणं महत्त्वाचं आहे. तसेच दुखण्यामागची विविध कारणं देखील तुम्हाला माहित असायला हवीत.

तुम्हाला जर पेनिट्रेशन करताना इतकं दुखत असलं की सेक्स करणंच अशक्य वाटत असेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका. असं तुमची व्हजायना अधिक टाईट असल्यामुळे होतं. याला व्हजायनिझम असं म्हटलं जातं. याबद्दल सल्ला घेण्यासाठी तुम्ही एखाद्या महिला डॉक्टरांना भेटायला हवं.

अनेकदा महिलांना मुलांना जन्म दिल्यानंतर सेक्स करताना त्रास होतो. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमची व्हजायना खूपच संवेदनशील असल्याचं जाणवत असेल व त्यामुळे सेक्स करताना खूपच त्रास होतो. असं असल्यास काळजी करू नका कारण मुलांच्या जन्मादरम्यान देण्यात येणाऱ्या काही मेडिकल प्रोसेसमुळे असं होतं.

तुम्हाला जर तुमच्या मासिक पाळीच्या काळात खूप रक्तस्राव होत असेल आणि व्हजायनल भागात खूप वेदना होत असतील तर अशा परिस्थितीत युरेटस फायब्रॉईड होऊ शकतं. यामुळेच तुम्हाला पेनिट्रेशनच्या वेळी खूपच त्रास होतो. यावेळी तुम्ही डॉक्टरांकडे जाणं बंधनकारक आहे.