Sex Tips: रात्रभर सेक्स करायची इच्छा आहे? Ejaculation मध्ये विलंब आणि Intense Orgasm प्राप्त करण्यासाठी वापरा 'या' सोप्या टिप्स
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pexels)

पती-पत्नी (Husband And Wife) मधील जिव्हाळ्याचे नाते बळकट करण्यासाठी सेक्स (Sex) महत्वाची भूमिका बजावतो. जे लोक जास्त वेळ सेक्स करू शकत नाहीत, त्यांना बर्‍याचदा असे वाटते की, ते आपल्या जोडीदाराला पूर्णतः संतुष्ट करू शकत नाहीत किंवा त्यासाठी सक्षम नाहीत. सहसा पुरुषाला वीर्यस्खलन (Ejaculation) करण्यासाठी सरासरी 6 मिनिटे लागतात. म्हणजेच पेनिट्रेशन (Penetration) केल्यावर अवघ्या पाच मिनिटांत पुरुषांना लैंगिक सुख (Sexual Pleasure) मिळते. मात्र, बर्‍याच पुरुषांना लैंगिक सुखांचा आनंद बराच काळ घ्यायचा असतो. अनेक पुरुष यात यशस्वीही होतात मात्र असेही काही पुरुष आहेत ज्यांची अवघ्या काही मिनिटांमध्ये सेक्स करण्याची इच्छा नाहीशी होते.

मात्र, आपल्या साथीदाराबरोबर ऑल नाईट सेक्स (All Night Sex) करण्याची इच्छा असल्यास, ते शक्य आहे. ऑल नाईट सेक्स दरम्यान आपण वीर्यस्खलनामध्ये विलंब (Ejaculation Delay) आणि परमोच्च आनंदासाठी (Intense Orgasm) काही टिप्स वापरुन पाहू शकता.

> संपूर्ण रात्र जर सेक्स करायचा असेल तर, संभोगादरम्यान कंडोम वापरणे आवश्यक आहे. कंडोमच्या वापरामुळे पुरुषाच्या जननेंद्रियातील संवेदनशीलता कमी केली जाऊ शकते.

> संभोगाच्या वेळी, वीर्यपात होण्यापूर्वी, आपल्या बोटाने आपल्या लिंगाला थोडेसे दाबा. यामुळे तुम्ही वीर्यस्खलन थांबवू शकता आणि बराच काळ सेक्सचा आनंद घेऊ शकता.

.> जास्त काळ संभोगाचा आनंद घेण्यासाठी Kegel Exercise केला पाहिजे. या व्यायामुळे तुमच्या लिंगाची ताठरता जास्त काळ राहील. यामध्ये तुम्ही असे समजा की तुम्ही मुत्रविसर्जन करताय पण फ्लो रोखताय. असे नियमित 10 वेळा करणे तुम्हांला फायदेशीर ठरू शकते.

> सेक्स करताना आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करूनही आपण सेक्सचा जास्त काळ आनंद घेऊ शकता. श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवून, जेव्हा आपल्या पोटावर अधिक ताण येतो, तेव्हा परमोच्च सुखाचा आनंद तुम्ही घेऊ शकता.

> पेनिट्रेशन केल्यावर जेव्हा तुम्हाला वाटेल की आता वीर्यस्खलन होणार आहे, त्याचवेळी लिंग बाहेर काढा व काही सेकंद थांबा व परत प्रणय क्रीडा सुरु करा. यामुळे तुमचा सेक्स करण्याचा कालावधी वाढेल.

> या व्यतिरिक्त, आपण दीर्घकाळापर्यंत आपले लिंग ताठर ठेवण्यासाठी आपल्या आपल्या अंडकोषाजवळ कपड्यात बर्फ लपेटून तो लावू शकता.

या टिप्स व्यतिरिक्त नियमित व्यायाम करा आणि सेक्स ड्राईव्ह वाढवणारा आहार घ्या. याद्वारे आपण आपले लैंगिक जीवन आनंदी आणि अतिरोमँटिक बनवू शकता. (हेही वाचा: Anal Sex Problems: गुदमैथुन करताना जोडीदारासमोर होऊ शकते तुम्ही फजिती; सेक्स करताना घ्या 'या' गोष्टींची काळजी)

दरम्यान, संभोगचा आदर्श कालावधी किती याबाबत निश्‍चित असा काही नियम नाही. सगळं स्त्रीच्या मानसिक तयारीवर आणि कामक्रिडेतील तंत्रावर अवलंबून असतं. प्रत्यक्ष संभोगापुर्वी, पुरूषाने स्त्रीला पूर्णपणे उत्तेजित करण्याचे कौशल्य दाखविणे ही निश्‍चित यशाची गुरूकिल्ली आहे.